पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पतीबरोबरच्या वादाबाबत व घटस्फोट (Divorce Case) घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी आलेल्या पक्षकार महिलेचा 62 वर्षाच्या वकिलाने विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी (Deccan Police Station) राजेंद्र गोविंददास शहा Rajendra Govinddas Shah (वय 62, रा. लक्ष्मीनारायण नगर, मेहंदळे गॅरेजजवळ) याच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
याप्रकरणी एका 29 वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार राजेंद्र शहा याच्या एरंडवणे (Erandwane) येथील आनंदोमय सोसायटीतील (Andomay Society Pune) कार्यालयात 27 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या पतीसोबत होणार्या वादाबाबत व घटस्फोट घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी अॅड. शहा (Adv Rajendra Govinddas Shah) यांच्या कार्यालयात आल्या होत्या. त्यावेळी कार्यालयात इतर कोणी नव्हते. चर्चा करुन त्या कार्यालयाच्या बाहेर जात असताना अॅड. शहा याने फिर्यादीच्या पाठीमागून घेऊन त्यांच्या पाठीवरुन हात फिरवून त्यांच्या डाव्या दंडाला पकडले व हाताचा इशारा करुन आत चल असे बोलून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या महिलेच्या फिर्यादीनुसार डेक्कन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक कवठीकर (PSI Kavtikar) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Molestation case has been registered against Adv Rajendra Govinddas Shah in the Deccan police station of pune
Indigo New Year Sale | इंडिगो देतंय अवघ्या 1,122 रुपयात विमान प्रवासाची संधी, तात्काळ बुक करा तिकिट