पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | कोणत्याही रुग्णाला रात्री अपरात्री औषधाची गरज पडल्यास त्याला औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी शहरातील अनेक मेडिकल दुकाने रात्रभर उघडी असतात. याचाच गैरफायदा घेऊन मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून एका मेडिकल दुकानाच्या गल्ल्यातील रोकड जबरदस्तीने चोरुन नेली. (Pune Crime)
याप्रकरणी उमेश चंद्रकांत यादव (वय २९, रा. नाईन ग्रीन अपार्टमेंट, हांडेवाडी रोड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री चौकात श्री स्वामी समर्थ मेडिकल दुकान आहे. बुधवारी पहाटे उमेश यादव हे दुकानात होते. पहाटे २ वाजून ४७ मिनिटांनी मोटारसायकलवरुन दोघे जण दुकानात आले. त्यांनी फिर्यादी यांना पिस्टलसारखे हत्याराचा धाक दाखविला (Pune Crime). गल्ल्यातील ५ हजार ५०० रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरुन नेली. सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून त्या अनुशंगाने पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Medical Shopkeeper was robbed at gunpoint Incidents in Kondhwa Police Station Limits
EPFO | पीएफमधून 1 तासात तुमच्या बँक खात्यात येतील पैसे; जाणून घ्या अॅडव्हान्स घेण्याची पद्धत
Sanjay Raut | संजय राऊतांचा थेट इशारा, म्हणाले – ‘… तर तुम्हाला नागपुरलाही जाता येणार नाही’
7th Pay Commission | कर्मचार्यांना मिळाली खुशखबर ! DA मध्ये झाली 3% ची वाढ, सरकारने केली घोषणा