पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | सिंहगड रोड (sinhagad road) परिसरातील सराईत गुंड महेश उर्फ बंट्या पवार आणि त्याच्या साथीदारांवर मोक्कानुसार कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात Pune Crime आली आहे. यापूर्वी देखील त्याच्यावर मोक्काची कारवाई केली होती. महेश उर्फ बंटी प्रकाश पवार Bunty Prakash Pawar (वय 36), शुभम बबन वाघमारे (वय 26) व प्रवीण बाळासाहेब ढाकणे (वय 19) अशी मोक्कानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बंट्या पवार Bunty Pawar हा सिंहगड रोड (sinhagad road) परिसरातील गुंड आहे. त्याची टोळी आहे. तो तुकाईनगर भागात राहतो. या टोळीने साथीदारांसह खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, जबरी चोरी, अपहरण, बलात्कार, बेकायदेशीर शस्त्र जवळ ठेवणे, दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे त्याच्यावर 2015 मध्ये मोक्कानुसार कारवाई केली होती. त्यानंतर तो 2019 मध्ये कारागृहातून बाहेर आला होता. तसेच अस्तित्व लपवून राहू लागला.
तर आरोपींना सोबत घेऊन त्याने पुन्हा गंभीर गुन्हे करण्यास सुरुवात केली होती.
त्यामुळे पोलिसांनी पुन्हा त्याला अटक करून येरवडा तुरुंगात रवानगी केली होती.
मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फायदा घेत न्यायालयातून तात्पुरत्या जामीनावर तो जानेवारी 2020 मध्ये येरवडा जेलमधून बाहेर आला होता.
यानंतर त्याने दोघांच्या मदतीने गांजा विक्री करण्यास सुरुवात केली होती. तर 20 जूनला सिंहगड पोलिसांनी 5 लाखाच्या गांजासह पकडले होते.
चौकशीत बंटी पवार हा आरोपींना सोबत घेऊन व्यवसाय सुरू केले असल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यामुळे या आरोपींवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे (senior police inspector devidas gheware) यांनी पोलीस उपायुक्त पूर्णिमा गायकवाड (Deputy Commissioner of Police Purnima Gaikwad) यांच्यामार्फत अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (additional commissioner of police dr. sanjay shinde) यांच्याकडे पाठवला होता.
त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्कानुसार कारवाई केली आहे.
Web Title : Pune Crime | MCOCA Action against notorious Bunty Pawar gang in Sinhagad Road area of Pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update