पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | चाकण येथील एमआयडीसी (Chakan MIDC) परिसरात असलेल्या एका एटीएमचा (ATM) पहाटे स्फोट (explosion) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.(Pune Crime)
चाकण परिसरातील आंबेठाण गावाजवळील (Ambethan village) भांबोली फाट्यावर हिताची बँकेचे एटीएम सेंटर (Hitachi Bank ATM Center) आहे. या एटीएम सेंटरमध्ये पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक कानठळ्या बसविणारा आवाज होऊन मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्यात या एटीएम सेंटरचा दरवाजा लांबवर जाऊन पडला. एटीएम मशीन पूर्णपणे जळून खाक झाले आहे. एटीएम(ATM) सेंटरच्या आजूबाजूंच्या काचांचा चक्काचूर झाला आहे. दरवाजाच्या सांगाडे पुढच्या बाजूला उडाले आहेत.
oin our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी चिंचवड पोलीस दला(Pimpri Chinchwad Police Force)तील बॉम्बनाशक पथक व श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. इतका मोठा स्फोट नेमका कशामुळे घडला याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही. या स्फोटात सुदैवाने कोणीही जखमी झालेले दिसून आले नाही. चाकण पोलीस ठाण्याचे (Chakan Police Station) वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटाच्या कारणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.
web title: Pune Crime | Massive explosion at ATM in Chakan MIDC; The type that happened around dawn.