पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | माहेरावरून दोन लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ सुरु होता. त्यातच पतीचे विवाहबाह्य संबंध. या सर्वांना वैतागून विवाहितेने आत्महत्या केल्याची (commits suicide) घटना पुण्यातील (Pune Crime) उरूळी कांचन (Uruli Kanchan) येथे घडली आहे. विवाहित महिलेने राहत्या घरात रविवारी (दि.17) गळफास घेऊन आत्महत्या (Pune Crime) केली. याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू, सासरे, चुलत सासू-सासरे, नणंद यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
शीतल विपुल नेवसे Shital Vipul Nevse (वय-28) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. तर पती विपुल नेवसे, सासू पुष्पा नेवसे, सासरा विलास नेवसे, चुलत सासरे कैलास नेवसे, चुलत सासू जयश्री कैलास नेवसे (सर्व रा. उरुळी देवाची), नणंद योगिता रासकर (रा. भेकराईनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शीतलचे वडील रोहिदास तुळशीराम सायकर यांनी फिर्याद (Pune Crime) दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल हिचे विपुल नेवसे सोबत 2014 मध्ये लग्न झाले होते. त्यांना 6 वर्षाचा मुलगा ही आहे. लग्नानंतर काही दिवसांतच विपुल दारु पिऊन शीतलला मारहाण (Beating) करत होता. माहेरुन दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच विपुलचे दुसऱ्या एक महिलेसोबत प्रेमसंबध असल्यावरुन त्यांच्यात वाद (Pune Crime) झाला.
चुलत सासऱ्यांनी देखील शीतलचा हात धरुन तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. अखेर तिने या सर्वाला वैतागून गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहिदास सायकर (Rohidas Saikar) यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
web title: Pune crime married woman commits suicide in uruli kanchan.
Pune Crime | पुण्यात दत्तवाडीमध्ये तरुणाचा चाकूने भोसकून खून; तिघा संशयितांना घेतले ताब्यात