पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime ) कात्रज परिसरात सोमवारी भरदिवसा गोळ्या (Firing) घालून एका व्यक्तीचा खून (Murder) केल्याची घटना ताजी असतानाच आज (मंगळवार) आणखी एक खूनाची घटना घडली आहे. सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या खूनाच्या घटनेमुळे पुणे (Pune Crime) हादरलं आहे.
किरकोळ कारणावरुन झालेल्या पती आणि पत्नी यांच्यात झालेला वाद विकोपाला गेला. या वादानंतर संतापलेल्या पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या (Khadak police station) हद्दीतील भवानी पेठ (Bhavani Peth) परिसरात ही घटना घडली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आसमा हवारी (Aasma Hawari) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती हौसिफ हवारी (Hausif Hawari) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलं भांडण करतात आणि त्रास देतात या कारणावरुन पती-पत्नीमध्ये सोमवारी रात्री वाद झाला होता.
हा वाद एवढा विकोपाला गेला की दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यानंतर संतापलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण (Beating) केली. यानंतर संपूर्ण कुटुंब झोपी गेले.
आज सकाळी पत्नी आसमा उठत नसल्याने आरोपी पती तिला उठवण्यासाठी गेला. त्यावेळी तिचे संपूर्ण अंग गार पडले होते. त्यानंतर पत्नीचा मृत्यू (Pune Crime) झाल्याचे उघडकीस आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | man killed wife after minor dispute in bhawani peth area of khadak police station near mamledar kacheri
Ajit Pawar | अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिला सल्ला; म्हणाले – ‘सरकार तुमचंच आहे पण त्याला लुटू नका’
Earn Money | फक्त 5000 रुपयांत सुरू करा स्वतःचा व्यवसाय, दरमहा बंपर कमाई; जाणून घ्या
Sara Tendulkar | सारा सचिन तेंडुलकरचं मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल (व्हिडीओ)
PMSYM | दररोज 2 रुपये भरा आणि मिळवा महिन्याला 3 हजार रुपयांची पेन्शन; जाणून घ्या योजना
Covid Jab | बिहारमध्ये PM मोदी-सोनिया-प्रियंकाने घेतला कोरोनाचा डोस! आरोग्य विभागाचा अजब खेळ