पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | तीन लग्नं झाली असताना एकही पत्नी नांदत नसल्याच्या नैराश्येतून एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव गावाजवळ असणाऱ्या पहाडदरा येथे ही घटना उघडकीस (Pune Crime) आली आहे. शेखर शांताराम पवार (वय 28) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मागील दोन महिन्यांपासून तो बेपत्ता होता. याबाबत त्याचे वडील शांताराम पवार यांनी पोलिसांत तक्रार केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर पवार याला तीन पत्नी होत्या. तो पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचा रहिवासी आहे. कामानिमित्त तो आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे राहत होता. त्याची तीन लग्नं झाली आहेत. मात्र, तिन्ही बायका त्याच्यासोबत नांदत नव्हत्या. यामुळे त्याच्या कुटुंबात नाराजीचे वातावरण होते. यातूनच तो नैराश्येत गेला. काही दिवसांपूर्वी तो घरातून निघून गेला. घरच्यांनी त्याचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. त्यामुळे वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलीस शेखरचा शोध घेत असताना पहाडदरा गावाजवळ जंगलात त्याचा सांगाडा लटकल्याचे दिसून आला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला.
त्यावेळी मृतदेहाच्या अंगावर असलेल्या शर्टाच्या खिशात आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळून आले.
पोलिसांनी नातेवाइकांचा शोध घेऊन घटनेची माहिती दिली. वडिलांना घटनास्थळी बोलावून घेत ओळख पटवण्यात आली. शेखर दोन महिन्यांपूर्वी घरातून निघून गेला होता. जाताना त्याने दोरी नेली होती, असे त्याच्या वडिलांनी सांगितले.
Web Title :- Pune Crime | man finished life due to depression in pune ambegaon did three marriages
हे देखील वाचा :
Raj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे
Rupali Thombare Patil | ‘राज ठाकरे पूर्वी असे नव्हते, भाजपच्या दबावामुळे बदलले’