पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील शिंदेवस्ती (Shindevasti) आणि हडपसर वाहतूक शाखेजवळ (Hadapsar Traffic Branch) असलेल्या कालव्यातून तीन मृतदेह (Dead body) बाहेर काढण्यात आले. जीवरक्षक डॉ. बच्चुसिंग टाक (Lifeguard Dr. Bachu Singh Tak) यांनी हे मृतदेह पाण्याबाहेर काढले. पोलिसांनी पंचनामा करुन शहीद भगतसिंग जीवन रक्षक फाउंडेशनच्या (Shaheed Bhagat Singh Jeevan Rakshak Foundation) रुग्णवाहिकेमधून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये (Sasoon Hospital) पाठवण्यात आले. (Pune Crime)
याबाबत बच्चूसिंग टाक यांनी सांगितले की, कालव्यातून मृतदेह वाहत येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत हडपसर वाहतूक शाखेजवळ दोन मृतदेह पाण्याबाहेर काढले. त्यावेळी शिंदेवस्ती येथे मृतदेह वाहत येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. (Pune Crime)
शिंदेवस्ती येथे आझादसिंग बच्चुसिंग टाक (Azadsingh Bachchusingh Tak) यांनी जाऊन एक पुरुष जातीचा मृतदेह बाहेर काढला. या तिन्ही मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले. पुढील तपास हडपसर पोलीस (Hadapsar Police Station) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Lifeguard Dr. Bachu Singh Tak Three Bodies Hadapsar Canal
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Blood In Urine | यूरिनमध्ये रक्त येणे ‘या’ जीवघेण्या आजाराचा आहे संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात!