पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पहिला प्रेम विवाह (love marriage) झालेला असताना त्याची माहिती लपवून दुसरे अरेंज मॅरेज (arrange ) करून तरुणीची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 7 जणांना अटक (Pune Crime) केली आहे. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी पती वैभव शंकर तांगुदे (वय 31), सासू लता शंकर तांगुदे, सासरे शंकर तांगुदे, मुलाचा मामा अरुण मोहकर, मामी वैशाली मोहकर, बहीण वर्षा वैभव मते, वैभव मते आणि पहिली पत्नी सारिका वैभव तांदुगे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर इतरांवर कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 22 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
Anil Deshmukh | अनिल देशमुख भूमिगत झाल्याची चर्चा रंगत असतानाच ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीच्या पतीचा पहिला
प्रेमविवाह झाला होता. पण त्याने ही बाब फिर्यादी यांच्यापासून लपवली. तर त्याच्या कुटुंबाला
देखील माहिती होती. मात्र, तरीही या सर्वांनी या तरुणीसोबत त्याचा 30 ऑगस्ट 2020 रोजी
अरेंजमॅरेज विवाह लावून दिला. मात्र, विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी पीडित तरुणीला पती कोणासोबत तरी बोलत असल्याचे जाणवले. तर तो विचारपूस केल्यानंतर त्याची माहिती लपवत
होता. मात्र फिर्यादी यांनी याबाबतची सखोल माहिती गोळा केली. त्यावेळी त्यांना पती वैभव याचा
पहिला विवाह झाला असल्याचे समजले. त्यानंतर तरुणीने आपली फसवणूक झाल्याबाबत
पोलिसात धाव घेऊन पतीसह त्याच्या कुटुंबीयांच्या विरोधात तक्रार दिली. फिर्यादी या एका खासगी
रुग्णालयात नोकरीस आहेत. तर वैभव हा बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. ए. खेतमाळस याप्रकरणी तपास करत आहेत. त्यांनी या संशयित आरोपींना तात्काळ अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने (Court) त्याना जामीन (Bail) दिला आहे.
Web Title :- pune crime kothrud police arrest 7 peoples in cheating case they got bail from court
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Central Universities CET | UGC ची मोठी घोषणा ! केंद्रीय विद्यापीठांमधील सीईटी परीक्षा रद्द
Aurangabad Crime | लष्करी छावणीतील झाडाला गळफास घेत जवानाची आत्महत्या; प्रचंड खळबळ
Google Chrome चा वापर करणार्यांनी व्हावे सावध, ताबडतोब करा हे काम अन्यथा होईल मोठे नुकसान