पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पानटपरीचालकावर चाकूने सपासप वार करून त्याच्याकडील साडेतीन हजार रुपयांची रोकड टोळक्याने जबरदस्तीने चोरून नेली. या घटनेत पानटपरीचालक जखमी झाला आहे. हा प्रकार रविवारी (दि.4) रात्री अकराच्या सुमारास कोंढवा येथील एनआयबीएम रोडवर ( Pune Crime) घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी 21 वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
फिर्यादी याची पानटपरी असून, रविवारी रात्री टोळके त्या ठिकाणी आले. टोळक्याने तरुणाला धमकावत त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. तसेच त्याच्या गल्ल्यातील साडेतीन हजार रुपये चोरून नेले. या घटनेत पानटपरीचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | knife attack on pan stall owner in kondhwa
हे देखील वाचा :
Pune Crime | अक्षर सुंदर नसल्याने मुलाला बेदम मारहाण; शिक्षिकेवर FIR, पुण्यातील प्रकार
Taj Mahal | ताज महालसंबंधीची याचिका न्यायालयाने फेटाळली