Pune Crime | पत्नीचा खून करुन गतिमंद मुलाला गुन्ह्यात अडकवले, पोलिसांच्या तपासात फिर्यादीच निघाला आरोपी

Pune Crime | killed his wife and ensnared his son finally the investigation revealed that the husband did it

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime | मुलाने आईकडे तंबाखू (Tobacco) घेण्यासाठी पैसे मागितले. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने मुलाने आईच्या (Mother) डोक्यात फावडे मारून खून (Murder) केला. ही खळबळजनक (Pune Crime) घटना जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळी या ठिकाणी मंगळवारी (दि.15) घडली होती. या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून महिलेचा खून मुलाने नाही तर त्या महिलेच्या पतीनेच केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पतीनेच पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अंजनाबाई बारकु खिल्लारी (वय-60) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत महिलेचा पती बारकू सखाराम खिल्लारी (वय-66) याने नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangaon Police Station) फिर्याद दिली होती. मुलानेच पत्नीचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद केले होते. यानंतर अमोल बारकु खिल्लारी (वय-23) याला पोलिसांनी अटक केली होती. त्याने तसा कबुली जबाबही दिला होता. (Pune Crime)

 

पोलिसांनी या तपासाची चक्रे फिरवली असता बारकू याने पोलिसांना दिलेल्या उत्तरात विसंगती आढळून आली. त्यातच अटक केलेला आरोपी अमोल हा गतिमंद असल्याचे समोर आले. पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे (PSI Vinod Dhurve) यांनी पोलीस खाक्या दाखवताच या खुनातील फिर्यादी बारकू हाच आरोपी असल्याचे सिद्ध झाले.

 

सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे (API Prithviraj Tate) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
खुनात निष्पन्न झालेला संशयित बारकु खिलारी याच्यावर कर्ज झाले होते. त्याला शेतजमीन विकून दुसरीकडे जायचे होते.
मात्र मयत अंजनाबाई यांचा याला विरोध होता. यामुळे अंजनाबाई व बारकू यांच्यात सतत वाद होत होते.
मंगळवारी अशाच वादातून बारकू याने प्रथम अंजनाबाईच्या दिशेने विळा फेकून मारला. तो त्यांच्या तोंडाला लागला.
यानंतर वाद वाढत गेले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याच वादातून बारकू याने बायकोच्या डोक्यात खोरे घालून तिचा खून केला. यानंतर त्याने आपला गतिमंद मुलागा अमोल याला सांगितले
की, तू पोलिसांना मी सर्व काही केले असे सांग बाकी मी सांभाळून घेतो असे सांगून आरोपी घरातून निघून गेला.
त्यानंतर त्याने मुलानेच खून केल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याचा हा बनाव फारकाळ टिकला नाही.
त्याला जुन्नर न्यायालयात (Junnar Court) हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | killed his wife and ensnared his son finally the investigation revealed that the husband did it

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘…बाळासाहेबांना हीच खरी आदरांजली ठरेल’ – अजित पवार

Chandrakant Patil | पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या उच्च शिक्षणासंदर्भात चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा, म्हणाले…

Pune Police CP Amitabh Gupta | गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत आवश्यक, नवनियुक्त उपायुक्तांना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचा कानमंत्र