Skip to content

बहुजननामा

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • Current Page Parent क्राईम
  • व्हिडिओ

Pune Crime | इंस्टाग्रामवर ‘त्या’ महिलेशी झालेली ओळख तरुणाला महागात पडली, महिलेनं ठेवले जबरदस्तीने ‘संबंध’; पण…

by Balavant Suryawanshi
pune crime instagram account youth in trouble while woman demands 5 lakhs
August 14, 2021
क्राईम ताज्या बातम्या पुणे महत्वाच्या बातम्या

पुणे :बहुजननामा ऑनलाईन –  Pune Crime | इंस्टाग्रामवरुन (Instagram) झालेल्या ओळखीतून एका महिलेने तरुणाला भेटायला बोलावले. त्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर आपल्या सहकार्‍यांमार्फत त्याचे अपहरण करुन त्याला लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी न्यू पनवेल येथील एका ३१ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलिसांकडे (Kondhwa Police) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेसह तिच्या 3 साथीदारांविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण व महिलेची इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर या महिलेने कोंढाव्यातील येवलेवाडी येथे या तरुणाला भेटायला बोलावले. त्यानुसार हा तरुण मोठ्या उत्साहाने 7 ऑगस्ट रोजी तिला भेटायला पुण्यात आला. तेथे या महिलेने त्याला जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादी हा तेथून आपल्या कारमधून निघाला असताना वाटेत तिघांनी त्याला अडवून ते जबरदस्तीने कारमध्ये बसले. फिर्यादीला त्यांनी मारहाण केली. तसेच एका इंस्टाग्राम आयडीवरील महिलेसोबत बलात्कार केला आहे. त्याची पोलिसांत खोटी तक्रार देण्याची धमकी दिली. पैसे दिले नाही तर या महिलेसोबत लग्न करावे लागेल, असे कागदावर लिहून  घेतले. त्यावर फिर्यादीची सही व अंगठा घेतला. त्यानंतर फिर्यादी याच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. तसेच फिर्यादीच्या खिशातील 50 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांच्याकडील एटीएम कार्डमधून जबरदस्तीने 30 हजार रुपये काढून घेतले. या घटनेने फिर्यादी तरुण घाबरुन जाऊन आपल्या घरी गेला होता. आरोपींकडून उर्वरित पैश्यांची मागणी होऊ लागल्याने त्याने कोंढवा पोलिसांकडे (Kondhwa Police) धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

web title: pune crime instagram account youth in trouble while woman demands 5 lakhs.

Pune Crime | सराफाचे लक्ष विचलित करुन दागिने लंपास करणाऱ्याला फरासखाना पोलिसांकडून तासाभरात अटक

FYJC Admission 2021 | अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक अखेर जाहीर ! प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु, जाणून घ्या कशी असेल प्रवेश प्रक्रिया

Police Officer Suicide | धक्कादायक ! रस्त्याच्या कडेलाच केली पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या, प्रचंड खळबळ

Pimpri News | लिफ्टमध्ये अडकलेल्या अल्पवयीन मुलाचा भिंत फोडून वाचवला जीव; म्हणाला – ‘मला पुनर्जन्मचं मिळाला…’

Tags: ATM CardbreakinginstagramInstagram AccountInstagram IDKondhwa Policelatest marathi newsNew PanvelPhysical contactPolice false report threatpune crimeYeolawadiइंस्टाग्रामकोंढवा पोलिसशारीरीक संबंध

  • Next Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात एंट्रीसाठी दोन्ही ‘डोस’ आवश्यक, RTPCR रिपोर्ट नसेल तर 14 दिवस राहावे लागेल ‘क्वारंटाइन’
  • Previous Pune Crime | सराफाचे लक्ष विचलित करुन दागिने लंपास करणाऱ्याला फरासखाना पोलिसांकडून तासाभरात अटक

Comments are closed.

You may also like

coronavirus-lockdown-increases-unemployment-rate-75-lakh-jobs-lost-in-april-india-covid-19-crisis

Lockdown Effect ! एप्रिल महिन्यात देशभरात 75 लाख जणांच्या नोकऱ्यांवर ‘गदा’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात...

May 5, 2021
ताज्या बातम्या

Pune Lonikand Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Lonikand Crime | पुणे शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेमाच्या जाळ्यात...

April 5, 2024
क्राईम

बहुजननामा © 2025. All Rights Reserved.