पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – शहरात लूटमार करणाऱ्या गुन्हेगारांनी हैदोस घातला असून, बंडगार्डन (Bund gardan) भागात एका तृतीयपंथीने एकाला लुटले तर कर्वेनगर (karve nagar) परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावली (Pune Crime) आहे. काहीही केले तरी या घटना रोखने पुणे पोलिसांना (Pune Police-Crime) अशक्यप्राय होऊ लागले आहे. Pune Crime | Incidents of looting in Karvenagar, Sadhu Vaswani Chowk and Khadki area
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बंडगार्डन पोलीस ठाण्यात (bund garden police station) याप्रकरणी 48 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार तृतीयपंथीयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे पायी चालत जात होते.
त्यावेळी साधू वासवाणी चौकात (sadhu vaswani chowk) एका तृतीयपंथीने त्यांना थांबवले. तसेच त्यांच्या खिशातील 6 हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला आहे.
तर कर्वेनगर (Karve Nagar) भागात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकवली (Snatched the gold chain) आहे.
याबाबत 47 वर्षीय महिलेने वारजे पोलीस (Warje Police Station) ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी या गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पतीसोबत कर्वेनगर येथील दीप ज्योत कॉलनी येथून पायी चालत जात होत्या.
यावेळी त्यांचे लक्ष नसताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या सोन साखळी चोरट्यांने त्यांच्या गळ्यातील सोन साखळी जबरदस्तीने हिसकावून नेली.
त्यांनी आरडाओरडा केला. मात्र चोरटा पसार झाला आहे.
तसेच तिसरी घटना खडकी (Khadki) भागात घडली आहे. मात्र या चोरट्याला पकडण्यात यश आले आहे. याबाबत 51 वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) तक्रार दिली आहे.
तर हंबीरराव दशरथ सुकाळे (वय 28, रा. भोसरी) याला अटक केली आहे.
फिर्यादी यांची मुलगी घरघुती साहित्य खरेदी करण्यासाठी खडकी बाजार परिसरात आल्या होत्या.
यावेळी त्या येथील एका दुकानात खरेदी करत असताना फिर्यादी या रस्त्यावर नातीला कंबरेवर घेऊन उभा होत्या.
त्याचवेळी चोरट्याने त्यांच्याजवळ येत त्यांच्या गळ्यातील 76 हजार रुपयांचे सोन साखळी हिसकावून नेली.
त्यांनी आरडाओरडा केल्याने सुकाळेला पकडण्यास यश आले आहे.
नागरिकांच्या मदतीने त्याला पकडले आहे.
अधिक तपास खडकी पोलीस (Khadki Police) करत आहेत.
Web Title : Pune Crime | Incidents of looting in Karvenagar, Sadhu Vaswani Chowk and Khadki area
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update