पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पूर्ववैमनस्यातून कोंढव्यात (Kondhwa) एका तरुणाचा कोयत्याने वार करुन निर्घृण खून (Murder In Pune) करण्यात आला. महेश लक्ष्मण गुजर Mahesh Laxman Gujar (वय २४, रा. गल्ली क्रमांक २६, शिवनेरीनगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शिवनेरीनगरमधील गल्ली क्रमांक १२ येथे बुधवारी रात्री साडेआठ वाजता घडली आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजर हा दुचाकीवरुन रस्त्याने जात होता. गुजर याचे आरोपींबरोबर यापूर्वी भांडणे झाली होती. कोंढव्यातील भगवा चौक परिसरात त्याला दोघांनी अडवले. त्यातील एकाने गुजर याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. हल्ल्यात गुजर हा गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात तो पडल्याचे पाहिल्यावर हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस (Kondhwa Police Station) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गुजर याला रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु (Death) झाला होता. कोंढवा पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी सांगितले की, गुजर याच्या बहिणीची एका तरुणाबरोबर मैत्री होती. राज पवार (Raj Pawar) हा त्या तरुणाचा मित्र आहे. गुजर आणि त्या तरुणामध्ये या कारणावरुन अनेकदा भांडणे झाली होती. त्यातून राज पवार व त्याच्या साथीदाराने महेश गुजर याचा खून (Murder) केला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
Web Title :- Pune Crime | In Kondhwa, a young man was killed due to previous enmity
हे देखील वाचा :
CNG Price Hike | सीएनजीच्या दरात आजवरची सर्वाधिक दरवाढ; 4 महिन्यात 29 रुपयांनी झाला महाग