पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या दोन पुतण्यांची घरे फोडून चोरट्यांनी तब्बल १०० तोळे (1 KG) सोन्यांच्या दागिन्यांसह ५३ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन (Pune Crime) नेला.
याप्रकरणी हरीश्चंद्र ऊर्फ राजू मनोहर मोझे (वय ४९, रा. राम मंदिराजवळ, संगमवाडी, येरवडा) यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली. राजू मोझे व त्यांचे भाऊ मोहन मोझे हे त्यांच्या घराला कुलूप लावून ३ सप्टेंबर रोजी बाहेरगावी गेले होते. ते रविवारी सायंकाळी परत आले. यावेळी घरात घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
चोरट्यांनी घराचे दरवाजांची कुलूपे तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरुममधील कपाटातील लॉकर उचकटून त्यांत ठेवलेले ४० लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे, चांदीचे दागिने, किंमती घड्याळे चोरुन नेली. तसेच मोहन मनोहर मोझे यांच्या घरात घरफोडी करुन सोन्याचे दागिने, किंमती घड्याळे, रोख रक्कम असा १३ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerwada Police Station) वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक समीर करपे (PSI Sameer Karpe) अधिक तपास करीत आहेत.
Pune Crime | भांडणात मध्यस्थी केल्याने सराईत गुन्हेगारासह चौघांकडून तरुणावर कोयत्याने वार
UPI Payment | इंटरनेटशिवाय करता येते पेमेंट, जाणून घ्या UPI पेमेंटची पूर्ण प्रक्रिया
Home loan संबंधीत 11 गोष्टी ज्या जाणून घेणे आवश्यक, अन्यथा कॅन्सल होऊ शकते लोन अॅप्लिकेशन;