पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | आई वडिल जादुटोणा करतात, त्यामुळे मला यश येत नाही, असा संशय घेऊन विवाहितेला मारहाण करुन छळ केला जात होता. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या (Married Woman Suicide) केली. दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) पतीला अटक केली आहे. (Pune Crime)
- Pune Crime | पुण्यात 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार, गर्भपात केल्याप्रकरणी रघुनाथ कुचिक याच्यावर गुन्हा दाखल
- Breakfast Tips | सकाळी उठून नाश्त्यात खा ‘या’ 2 गोष्टी, होतील जबरदस्त लाभ, अनेक आजार राहतील दूर
अतुल गोरख साळवे (रा. जनता वसाहत, पर्वती) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. सुनिता साळवे आणि आकाश साळवे (रा. जनता वसाहत, पर्वती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कविता अतुल साळवे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. (Pune Crime)
याप्रकरणी प्रकाश त्रिंबक तायडे (वय ६०, रा. चांगेफळ, बुलढाणा) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी कविता हिचा विवाह अतुल गोरख साळवे यांच्याशी झाला होता. लग्न झाल्यापासून तिचा सासरी छळ होत होता. तुझ्यासोबत लग्न झाल्यामुळे माझे वाटोळे झाले. तुला घरातील काम करता येत नाही. तुझे वडील जादु टोणा करतात. त्यामुळे मला यश येत नाही, असे बोलून तो तिच्याशी वाद घालून मारहाण करीत असे़ या शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून कविता हिने २ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्यावर अंत्यसंस्कार व अन्य विधी केल्यानंतर तिच्या वडिलांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक खरात अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Harassment of a married woman on suspicion of practicing witchcraft Husband arrested in woman’s suicide case
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update