पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ (Gangster Nilesh Ghaiwal) टोळीतील मोक्का (MCOCA Action) Mokka गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट 3 (Pune Police Crime Branch) च्या पथकाने अटक (Arrest) केली आहे. दिपक रमेश आमले Deepak Ramesh Amle (वय-29 रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी,
आशिष गार्डन शेजारी, कोथरूड, सध्या रा. नांनज, ता. जामखेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई रविवारी (दि.20) अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) जामखेड तालुक्यातील नांनज (Nannaj Jamkhed Taluka) याठिकाणी केली. (Pune Crime)
आरोपी दिपक आमले याच्या विरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) मोक्कांतर्गत गुन्हा दाखल असून गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. चार वर्षापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, गुन्हे शाखेचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी दिपक आमले हा नांनज येथील शेतात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
त्याच्याकडे केलेल्या चौकशीदम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan), पोलीस अंमलदार टेकावडे व पडवाळ यांनी केली.
Web Title :- Pune Crime | Gangster Nilesh Ghaiwal gang accused arrested by Pune Police crime branch, had been absconding for 4 years
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | इंदापूरमधील शासकीय गोडाऊनजवळ राहणार्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
Lalu Prasad Yadav Fodder Scam | चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना शिक्षा आणि दंड