पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | बिर्याणी घेण्यासाठी आलेल्यांना थोडे थांबा असे सांगितल्याने चिडलेल्या सराईत गुंडांनी आपल्या साथीदारांना बोलावून हॉटेलमध्ये राडा घातला. हॉटेल व्यावसायिक व त्याच्या एका कामगारावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. सिंहगड रोड पोलिसांनी सराईत गुंडांसह 6 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक (Pune Crime) केली आहे.
वैष्णव ऊर्फ बापू झांबरे (वय २३, रा. धायरी) आणि महेश संजय उबाळे (वय १९, रा. नर्हे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अनिकेत जाधव (रा. धायरी), ओंकार सातपुते (रा. नर्हे), संकेत मिरगल (रा. धायरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अनिकेत जाधव, वैष्णव झांबरे, महेश उबाळे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
याप्रकरणी मयुर मते (वय ३३, रा. धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. मते यांचे धायरीमध्ये गारवा बिर्याणी हे हॉटेल आहे. शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ते हॉटेलमध्ये जेवण करीत होते. त्यावेळी ओंकार सातपुते व संकेत मिरगल हे बिर्याणी घेण्यासाठी आले होते. ते जेवत असल्याने व इतर कामगार अन्य काम करीत असल्याने त्यांनी थोडे थांबा असे त्यांना सांगितले. त्यावरुन त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा मते यांनी हॉटेलमध्ये महिला ग्राहक आहेत, असे म्हणत शिवीगाळ न करण्यास सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यातून त्यांच्यात वादावादी झाली. त्याचा राग आल्याने दोघांनी आपल्या इतर गुंड साथीदारांना बोलावून घेतले. त्यांनी हॉटेलमध्ये घुसून मते यांच्यावर कोयत्यासारख्या धारधार हत्याराने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केला. तेव्हा फिर्यादी यांच्या शेजारी उभा असलेल्या कामगार इसराफिल हा मध्ये आल्याने तो वार त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसून तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा वार केल्यावर फिर्यादी यांनी खुर्चीच्या सहाय्याने त्याचा वार अडविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीवर वार होऊन त्यात ते गंभीर जखमी झाले.
दोघांच्या साथीदारांनी हॉटेलमधील बिर्याणीची पातेले, झाकणे, खुर्च्या व ट्रे इत्यादी साहित्य फिर्यादी व
हॉटेलमधील कामगार अश्फाक, इसराफील व इतर कामगारांवर फेकून मारुन जखमी केले. हा प्रकार
पाहून हॉटेल समोर लोकांची गर्दी जखमी होती. तेव्हा या टोळक्याने जमलेल्या लोकांना व आजु
बाजुच्या दुकानदारांना शिवीगाळ करीत दमदाटी करुन दहशत निर्माण केली. सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडकर (PSI Khedkar) तपास करीत आहेत.
web title: Pune crime gangs of criminals attack on hotel owner attempt to murder case sinhagad road police station.
Pune Rape Case | पुण्यात सोशल मिडियावरील ओळखीतून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार