पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | शेठला फार दिवसांनी मुलगा झाला आहे, तो साड्या व पैसे वाटणार असल्याच्या थापांना भुलून दोघा ज्येष्ठ नागरिक महिलांना चोरट्यांनी अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगून लुबाडले. या घटना सिंहगड रोडवरील (Sinhagad Road) वडगाव (Wadgaon) आणि पाषाण (Pashan) येथे घडल्या. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत एका ८५ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४७०/२२) दिली आहे. ही घटना वडगाव येथील किर्तीनगरमधील गंगोत्री लेडिज कलेक्शनसमोर ५ नोव्हेबर रोजी सकाळी अकरा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पायी जात असताना एक जण त्यांच्याजवळ आला. माझ्या शेठला फार दिवसांनी लेकरु झाले आहे. ते म्हतार्या बायकांना साड्या व पैसे वाटणार आहे, असे सांगून त्यांना गोल्डन बेकरीसमोर घेऊन गेला.
तेथे त्याचा दुसरा साथीदार होता. त्याने लाल रंगाच्या पिशवीत असलेले पैशांचे बंडल दखविले. त्यांना अंगावरील सर्व दागिने काढून त्या पिशवीत ठेवण्यास सांगितले. तसे केल्यावर पिशवीत असलेले पैशांचे बंडल मिळतील, असे आमिष दाखविले. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या अंगावरील १ लाख ८९ हजार ४०० रुपयांचे ३९ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्या पिशवीत ठेवले. त्यानंतर त्यांनी हातचलाखी करुन त्यांना बिस्किटांचे पुडे असलेली पिशवी देऊन ते निघून गेले. त्यानंतर त्यांनी पिशवी उघडून पाहिल्यावर त्यात दागिने आढळून आले नाही. सहायक पोलीस निरीक्षक कादबाने (Assistant Police Inspector Kadbane) तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत पाषाणमधील ७९ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात
(Chaturshringi Police Station Pune) फिर्याद (गु. रजि. नं. ४२०/२२) दिली आहे.
फिर्यादी या रविवारी सकाळी पावणेबारा वाजता पाषाण मधील पारखे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये असताना एक जण
त्यांच्याजवळ आला. येथे बोळामध्ये आमच्या शेठजीला मुलगा झाला आहे,
म्हणून ते साड्या व लुगडे वाटप करतायेत, तुम्ही चला असे म्हणाला.
त्या जात नसताना देखील कपडे फुकट आहेत तर घेऊन टाका असे म्हणून त्यांना तेथे घेऊन गेला.
त्यांच्याकडे असलेले २५ हजार रुपयांचे १ तोळ्याचे मंगळसुत्र त्याच्याकडे ठेवण्यास भाग पाडले.
त्यानंतर लुगडे घेऊन येतो, असे सांगून तो मंगळसुत्र घेऊन निघून गेला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक महाडिक (PSI Mahadik) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Free sarees lured 2 senior women dearly; Incidents in Sinhagad Road and Pashan area
हे देखील वाचा :
EWS Reservation | न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, EWS आरक्षणाचा मार्ग मोकळा; मिळणार 10 टक्के आरक्षण
Janhvi Kapoor | जान्हवी कपूरने बॉयफ्रेंड ओरहान विषयी केले ‘हे’ मोठे वक्तव्य; म्हणाली…..