पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपच्या (bombay engineer group) रिलेशन भरतीसाठी बनावट जन्म दाखला सादर करुन वय लपवून भरतीसाठी पात्र होण्याचा प्रयत्न करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा (Pune Crime)दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police) परसराम बलीराम डोंगरे (रा. बजाला, पो़ पुलसंगावी, ता. गेवरी, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. हा प्रकार ४ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२१ दरम्यान बी. ई. जी. सेंटर, खडकी येथे घडला आहे.
परसराम डोंगरे हा बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपच्या रिलेशन भरतीसाठी आला होता. त्याचे वय मुळ कागदपत्रांनुसार जास्त असल्याने ते वय लपवून भरतीस पात्र होण्यासाठी त्याने त्यांची जन्मतारीख १ ऑगस्ट १९९७ असताना त्याने रिलेशन सर्टिफिकेटवर आपली जन्मतारीख २६ डिसेंबर २००२ अशी असल्याचे नमूद असणारे खोटे सर्टिफिकेट सादर करुन भारतीय सैन्य दलाची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक मगदूम तपास करीत आहेत.
Web Titel : Pune Crime | fraud of bombay engineering group by giving fake birth certificate in army recruitment incident at vishrantwadi in pune