पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची (Former Congress Corporator) सुमारे एक कोटीची फसवणूक (Fraud Case) केल्याची घटना (Pune Crime) घडली आहे. जागेच्या व्यवहारामध्ये सुमारे 99 लाख 35 हजार रुपये घेऊन नोटरी करारनामा केला. त्यानंतर बाकी रक्कम देण्यास तयार असून देखील खरेदीखत न करताही फसवणूक (Cheating Case) केली. ही धक्कादायक घटना पिंपरी येथील खराळवाडी (Kharalwadi) मध्ये जानेवारी 2015 ते 21 एप्रिल 2022 या कालावधी दरम्यान घडली.
याप्रकरणी सद्गुरू महादेव कदम (Sadhguru Mahadev Kadam) (वय, 50, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी शुक्रवारी (22 एप्रिल) रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. या तक्रारीनंतर अशोक रामेश्वर गोयल (Ashok Rameshwar Goyal) (वय, 70) आणि समीर अशोक गोयल (Sameer Ashok Goyal) (वय, 40, दोघेही रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)
याबाबत माहिती अशी की, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी सद्गुरू कदम यांना खराळवाडी येथील इमारतीपैकी तिसऱ्या मजल्यावरील बांधकाम व त्यावरील संपूर्ण टेरेस विकत घेण्यासाठी 99 लाख 35 हजार रुपये आरोपी यांना दिले. त्यानुसार आरोपींनी नोटरी करारनामाही करून दिला. फिर्यादी हे बाकी 10 लाख 65 हजार रुपये देण्यास तयार असताना देखील आरोपींनी खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली. यानंतर फिर्यादी कदम यांनी पोलिसात धाव घेतली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ (Police Inspector Bhojraj Misal) करत आहेत.
Web Title :- Pune Crime | fraud cheating case of crore with former congress corporator pimpri police FIR against Ashok Rameshwar Goyal and Sameer Goyal
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Sweat Control Tips | उन्हाळ्यात घाम जास्त येतो का?, जाणून घ्या ‘स्वॅट कंट्रोल’च्या 5 टिप्स
Women’s Health | उन्हाळ्यात पीरियड्समध्ये दुर्लक्ष करून नका ‘या’ 5 हायजीन टिप्सकडे, जाणून घ्या