पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | प्रकल्पाच्या आराखड्यात परस्पर बदल करुन सुधारित केलेल्या नकाशात २ फ्लॅटच्या क्षेत्रफळामध्ये फेरबदल करुन तसेच एक फ्लॅट वगळून तिघा जणांची १ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) द रेव स्किमचे मुळ जागा मालक अशोक फुलचंद भंडारी (Ashok Fulchand Bhandari) यांच्यासह AMI Estates LLP च्या भागिदार व इतरांवर गुन्हा (Fraud Case) दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये 6 जणांचा समावेश आहे. (Pune Crime)
कमलेश अशोक छाजेड (रा. सिंध हिंदु सोसायटी, लुल्लानगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन अशोक फुलचंद भंडारी (रा. मार्केटयार्ड), अक्षय अशोक भंडारी (Akshay Ashok Bhandari),
साधना अशोक भंडारी (Sadhana Ashok Bhandari), राजन नेमीचंद रायसोनी Rajan Nemichand Raisoni (रा. प्रभात रोड – Prabhat Road, Pune), सिद्धांत विजय कोठारी Siddhant Vijay Kothari (रा. मुंबई), अमान ऊर्फ अरमान सुनिल कोठारी Aman alias Armaan Sunil Kothari (रा. मुंबई – Mumbai) अशी गुन्हा दाखल (IPC 420, IPC 409, 34) झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार २०१५ पासून आजपर्यंत घडला आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथे एमि इस्टेट प्रकल्प (AMI Estates Project) आरोपींनी भागीदारीमध्ये उभारला आहे. या प्रकल्पात फिर्यादी व त्यांची आई प्रमिला अशोक छाजेड यांचे नावे फ्लॅट नं. ७०१ व ७०३ हे रजिस्टर केले होते. त्यांची नातेवाईक रेश्मा जैन यांचे नावे फ्लॅट नं. ७०२ रजिस्टर होता. या आराखड्यामध्ये व क्षेत्रफळामध्ये फ्लॅटधारकांच्या समंतीशिवाय फेरबदल करुन १ कोटी १५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
रेश्मा जैन यांचा प्रकल्पातील फ्लॅट हा त्यांच्या नावावर रजिस्टर असून तो ३०.०१ चौ़. मी. आहे. जागा मालक अशोक भंडारी याने भागीदारी फर्मला ३० लाख रुपये दिले असून रेश्मा जैन यांच्या परवानगीशिवाय सुधारित केलेल्या नकाशामधून त्यांचा फ्लॅट वगळून त्यांची ३० लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केली. फिर्यादी कमलेश छाजेड, त्यांची आई प्रमिला छाजेड आणि रेश्मा जैन यांची १ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे Economic offences wing Pune (EOW, Pune) पोलीस निरीक्षक शेळके अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Fraud by mutually altering project layout Ashok Bhandari Rajan Raisoni Siddhant Kothari Aman alias Armaan Kothari and 6 others have been charged with fraud of Rs 1.45 crore
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी
Khed Shivapur Toll Plaza | खेड-शिवापूर टोल नाक्यावर MH12 आणि MH14 वाहनांना टोलमाफी बंद