Pune Crime | आळंदीतील जोग महाराज शिक्षण संस्थेतील 4 विश्वस्तांवर फसवणुकीचा FIR

Pune Crime | four trustees jog maharaj education institute alandi of pune fraud case registered.

पुणे / आळंदी : बहुजननामा ऑनलाइन  – Pune Crime | अध्यक्षांची परवानगी न घेत बेकायदेशीरपणे विश्वस्त मंडळाची सभा बोलावून सभावृत्तांत संस्थेच्या चिटणीस नेमणुकीबाबत खोटा दस्तऐवज (False document) तयार करुन, विश्वस्त मंडळाची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) आळंदी येथील नामवंत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत (Jog Maharaj Varkari Shikshan Sanstha Alandi) हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात (Alandi Police Station) चार विश्वस्तांवर फसवणुकीचा (Fraud) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

दिनकर बालाजी भुकेले Dinkar Balaji Bhukele (रा. शिवाजीनगर, पुणे), सुखदेव शिवाजीराव पवार पाटील Sukhdev Shivajirao Pawar Patil (रा. आळंदी देवाची), सुरेश गोपाळराव गरसोळे Suresh Gopalrao Garsole (रा. एरंडवणे, पुणे), बद्रीनाथ किसनराव देशमुख Badrinath Kisanrao Deshmukh (रा. शेवगाव, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

या चौघांनी अध्यक्षांची परवानगी न घेता मिटींग बोलावून चिटणीस पदावर सुखदेव शिवाजीराव पवार यांनी नियमबाह्य नेमणूक केली.
खोटे शिक्के, खोटे दस्तऐवज तयार केले, असे संस्थेचे अध्यक्ष संदीपान जनार्धन शिंदे Sandipan Janardhan Shinde (वय-74 रा. आळंदी देवाची, ता. खेड मूळ रा. उस्मानाबाद) यांनी फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

या प्रकारामुळे आळंदीतील नामवंत वारकरी शिक्षण संस्थेतील वाद उफाळून आला आहे. ही वारकरी संस्था 1917 पासून कार्यरत आहे.
राज्यातील अनेक कीर्तनकार व प्रवचनकार या ठिकाणी आध्यात्मिक शिक्षण घेत आहेत. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime | four trustees jog maharaj education institute alandi of pune fraud case registered.

 

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा, म्हणाले – ‘नरेंद्र मोदींवर आई-वडिलांपेक्षाही अधिक श्रद्धा, गप्प बसणार नाही’

T20 World Cup | अजूनही टॉप 2 मध्ये राहू शकतो भारत, नॉकआऊटसाठी करू शकतो ‘क्वालिफाय’

Sukanya Samriddhi Yojana | तुमच्या मुलीला कधीही भासणार नाही पैशांची कमतरता ! केवळ 416 रुपये गुंतवून मिळवा 65 लाख, जाणून घ्या

EPFO | जर अजूनही आले नसतील तुमच्या अकाऊंटमध्ये PF च्या व्याजाचे पैसे तर असे तपासू शकता; जाणून घ्या पद्धत