Pune Crime | कोर्टाबाहेर माजी सैनिकाचा गोळीबार ! पत्नीचा मृत्यू तर सासू गंभीर जखमी, शिरुरमध्ये प्रचंड खळबळ

Pune Crime | former soldier opens fire at wife mother in law shirur court pune crime news

पुणे/शिरुर : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | शिरुर न्यायालयाच्या (Shirur Court) बाहेर आज एका व्यक्तीने दोन महिलांवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. न्यायालयात घटस्फोटाची केस सुरु असताना कोर्ट परिसरात पतीने सासू (Mother-in-Law) आणि पत्नीवर (Wife) गोळीबार (Pune Firing) केला. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पाटबंधारे कार्यालयाच्या (Irrigation Office) परिसरात हा प्रकार घडला. आरोपी हा माजी सैनिक (Ex-Servicemen) असल्याची माहिती मिळत आहे. दाम्पत्याच्या घटस्फोटाचा (Divorce) दावा कोर्टात दाखल असून याच कारणावरून आरोपी पतीने पत्नी आणि सासूवर गोळीबार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला तर सासू जखमी Pune Crime) झाली आहे.

शिरुर न्यायालयाच्या परिसरात गोळीबार (Shirur Firing) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जावयाकडून (Son-in-Law) सासू आणि पत्नीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर सासूची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक असल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे. सासूवर शिरुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा न्यायालयाच्या परिसरात दाखल झाला.

नेमकं काय घडलं?
सकाळी शिरुर येथे पाटबंधारे विभाग कार्यालय परिसरात दीपक पांडुरंग ढवळे Deepak Pandurang Dhawale (माजी सैनिक, रा. अंबरनाथ -Ambernath, जि. ठाणे-Thane) याने त्याच्या परवाना प्राप्त पिस्तूलमधून (licensed Pistol) त्याची पत्नी मंजुळा रंगनाथ झांबरे Manjula Ranganath Zambare (रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर-Ahmednagar) व तिच्यासोबत असलेली तिची आई यांच्यावर गोळीबार केला.

Web Title :- Pune Crime | former soldier opens fire at wife mother in law shirur court pune crime news

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update