पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | भरती प्रक्रियेसाठी (Recruitment Process) मागासवर्गी कक्षाकडून बिंदु नामावली न घेता परस्पर पद भरतीची जाहिरात काढून भरती प्रक्रियेत गैरव्यवहार करणार्या क्रीडा व युवक सेवा विभागाच्या (Department of Sports and Youth Services) उपसंचालकासह (Deputy Director) तिघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
निवृत्त उपसंचालक जनक टेकाळे Janak Tekale (वय ६४), अमित खोमणे Amit Khomane (वय ४०) आणि विजय संतान Vijay Santhan (वय ५६) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. क्रीडा व युवक सेवा विभागात हे जनक टेकाळे हे उपसंचालक तर अमित खोमणे कनिष्ठ लिपीक व विजय संतान हे उपसंचालक होते. २०१५ ते २०१६ मध्ये हा प्रकार घडला आहे. विजय संतान सध्या अमरावती येथे कार्यरत आहेत. याप्रकरणी क्रीडा व युवक सेवा विभागाचे प्रभारी उपसंचालक महादेव आबा कसगावडे (Mahadev Aba Kasgawde) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४९७/२२) दिली आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी सांगितले की, एनसीसी २०१५ चे भरती प्रक्रियेमध्ये मागासवर्गीय कक्षाकडून बिंदु नामावली न घेता शासनाची परवानगी न घेता भरती प्रक्रिया राबविली़ भ ज (ब) या प्रवर्गातून वाहनचालक हे पद भरण्याची जाहिरात दिलेली असताना प्रत्यक्षात त्यांना डावलून भ ज (क) च्या उमेदवारांची नियुक्ती केली आहे.
भरती प्रक्रियेत उमेदवाराचा ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज नसताना त्यांना वाहनचालक या पदावर नियुक्ती
केली. तसेच सफाई कामगार या पदावर एका उमेदवाराची नेमणुक केली आहे.
कनिष्ठ लिपीक हे पद मागासवर्गीय मधून भरावयाचे असतानाही खुल्या प्रवर्गातील एका १७ वर्षाच्या अल्पवयीन
मुलाला नियुक्ती दिली.
भरती करुन बेकायदेशीर नियुक्त्या देऊन बनावटीकरण करुन शासनाची फसवणुक केली.
पोलीस निरीक्षक चक्रे (Police Inspector Chakre) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | FIR against three including deputy director for malpractice in recruitment process; Appointment given to a minor
हे देखील वाचा :