Pune Crime | पालघर येथील महिला पोलिसाबरोबर विवाहबाह्य संबंध; कारागृहात पोलिस असलेल्या पत्नीला बेल्टने मारहाण करणारा पुण्यातील पोलिस कर्मचारी ‘गोत्यात’

Pune Crime News | Assistant Police Inspector threatened in court to withdraw rape case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | विवाहबाह्य संबंध ठेवून (Extramarital Affair) त्याबाबत विचारणा करणार्‍या पत्नीला पट्ट्याने मारहाण करुन शारीरीक व मानसिक छळ करणार्‍या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

संदिप हिरामण खंडागळे Sandeep Hiraman Khandagle (वय ३०, रा. देवी लाईऩ, जेल वसाहत, येरवडा) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. संदिप खंडागळे हा येरवडा वाहतूक विभागात (Pune Traffic Police) नेमणुकीला आहे.
याबाबत त्याच्या पत्नीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५१८/२२) दिली आहे. हा प्रकार जून २०१९ पासून सुरु होता. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप खंडागळे याचा कारागृहात पोलीस असलेल्या फिर्यादी यांच्याबरोबर विवाह झाला आहे.
संदिपने फिर्यादी यांना लग्नात आलेले स्त्री धन त्यांच्या समंतीशिवाय परस्पर बँकेमध्ये तारण ठेवले.
ते अद्याप परत केले नाही. पालघर येथील महिला पोलीस शिपाई बरोबर विवाह बाह्य संबंध ठेवले.
त्याबाबत विचारणा केली असता फिर्यादीस त्याने शिवीगाळ करुन मारहाण केली.
तसेच फिर्यादी या गरोदर असताना त्यांना बेल्टने मारहाण केली.
फिर्यादी यांचा पगार स्वत:चे खात्यावर जमा करुन फिर्यादीचा मानसिक व शारीरीक छळ केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक काटे अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime | FIR Against Policeman Sandeep Hiraman Khandagle In Yerwada Police Station

 

हे देखील वाचा :

Pune Accident News | कात्रज घाटामध्ये दुचाकी आणि एसटी बसचा भीषण अपघात, एकचा मृत्यू

PI To DySP/ACP Promotion | लवकरच 175 पोलीस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती

Ajit Pawar | आगामी निवडणुकीत आघाडीची वाट पाहात बसू नका, एकटे लढण्याची तयारी करा; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सूचक सल्ला