पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | एकाच फ्लॅटवर तीन वेगवेगळ्या बँकेत बनावट व खोटे दस्तऐवज (Fake Documents) सादर करुन त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांचे कर्ज बँकांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे (Pune Crime). याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) गिरीश रामचंद्र कामत (Girish Ramchandra Kamat), त्यांची पत्नी पल्लवी गिरीश कामत (Pallavi Girish Kamat) आणि ऑरेंज लॅडमार्कचे (Orange Ladmark) भागीदार अविनाश दत्तात्रय भदारके (Avinash Dattatraya Bhadarke) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Fraud Case)
याप्रकरणी उदय वाळवेकर (वय ५७, रा. विमाननगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश कामत यांनी वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथे बांधलेल्या ऑरेंज लँडमार्क इमारतीतील तिसर्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ३०१ यावर स्टेट बँक ऑफ इंडियाकडे State Bank Of India (SBI) अर्ज केला होता.
बँकेने त्यांना ५४ लाखांचे कर्ज मंजूर केले.
त्यानंतर तपासणी करत असताना गिरीश कामत याने ऑरेंज लँडमार्कचे भागीदार अविनाश भदारके (Avinash Bhadarke, Partner Of Orange Landmark)
यांच्याशी संगनमत (Pune Crime) करुन साऊथ इंडियन बँक शाखा (South Indian Bank Viman Nagar Branch),
विमाननगर यांच्याकडून ४९ लाख, बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra), इंद्रायणीनगर, भोसरी शाखा (Bhosari)
यांच्याकडून ५४ लाख रुपये कर्ज मंजूर करुन घेतले असल्याचे आढळून आले.
तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ५४ लाख अशी एकूण १ कोटी ५७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करुन घेऊन अपहार करुन बँकेची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title :- Pune Crime | FIR against Girish Ramchandra Kamat Pallavi Girish Kamat and Avinash Bhadarke, Partner Of Orange Landmark in Chandannagar police station fraud cheating case
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- Maharashtra Police | पोलिसावर तलवारीने हल्ला, पोलीस निरीक्षकांचा आरोपीवर गोळीबार
- Ajit Pawar-Devendra Fadnavis | शरद पवार यांच्या घरावर हल्ला ! अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या ‘सेम’ प्रतिक्रिया; म्हणाले…
- Maharashtra Police | पोलिस प्रशिक्षण केंद्रातील 29 पोलिसांना जेवणातून विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर