Pune Crime | खंडणी अन् बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या मनोहर मामा भोसलेला अटक; सातार्‍याच्या लोणंदमधून एलसीबीनं घेतलं ताब्यात

Pune Crime | Finally Manohar Mama Bhosle was arrested by Pune Rural Police and found in Satara.

पुणे :बहुजननामा ऑनलाईन –  Pune Crime | संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत बारामती (Baramati) तालुक्यातील युवकाची फसवणूक केल्याचा गुन्हा मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा Manohar Mama Bhosale (वय-39 रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्यावर दाखल करण्यात आला आहे. गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर मनोहर मामा फरार झाला होता. त्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) त्याला सातार्‍याच्या लोणंद (Satara) परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्याला बारामती तालुका पोलिस (Baramati Taluka Police Station) ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात अटक करण्यात आली असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Rural SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी पोलीसनामा ऑनलाइनशी बोलताना (Pune Crime) दिली आहे.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर भोसले, विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे या तिघांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

बारामती तालुक्यातील 23 वर्षीय युवकाच्या वडीलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत खरात यांच्या वडीलांच्य गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगितले.
तसेच बाभळीचा पाला, साखर, भंडारा, खाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करुन तक्रारदार यांच्याकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. पैसे परत मागितल्यावर तक्रारदार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामतीचे अप्पर अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या
मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके,
बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी ही कारवाई केली आहे.

 

Web Title : Pune Crime | Finally Manohar Mama Bhosle was arrested by Pune Rural Police and found in Satara.

 

Pune Court | फरार कालावधीत रविंद्र बऱ्हाटेला घरात ‘थारा’ देणाऱ्या वकिलाच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय, जाणून घ्या

Crime News | पतीच्या निधनानंतर वृद्ध पत्नीनेही केली 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Crime News | स्विमिंग पूलमध्ये महिला पोलिसासोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस उपाधीक्षकाला अटक

Pune Crime | आयटी कंपनीच्या मालकाकडून 9 लाखाची खंडणी घेणाऱ्या कुख्यात गजा मारणे टोळीच्या हस्तकाला गुन्हे शाखेकडून अटक