पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील कमेंट्स (Vulgar Comment) करणाऱ्या तरुणाला पुण्यातील आळेफाटा पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अमित वायकर Amit Waikar (रा. कावळे मळा, चाळकवाडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे (Pune Crime) नाव आहे. यासंदर्भात भाजपच्या नेत्या अशाताई बुचके (BJP Leader Ashtai Buchke) यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात (Alephata Police Station) तक्रार दिली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा मोबाईलवर फेसबुक (Facebook) सोशल मीडिया (Social Media) पाहात होता. त्यावेळी त्याने एका वृत्तपत्राची बातमी पाहिली. ठाणे येथील सभेत खरी शिवसेना (Shivsena) आमच्यासोबत असल्याची ती बातमी होती. आरोपी अमित याने कमेंट बॉक्समध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून अश्लील कमेंट केली. (Pune Crime)
अमितने केलेली कमेंट सर्व समाज माध्यमांवर व्हायरल झाली. राजकारणातील एका प्रतिष्ठित आणि मोठ्या व्यक्तीच्या पत्नीबाबत असे शब्द वापरल्यामुळे खळबळ उडाली.
याची दखल घेत जुन्नर भाजप नेत्या बुचके यांनी तरुणाविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी घटनेची दखल घेत आरोपी अमित वायकर याला ताब्यात घेतले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर (Police Inspector Pramod Kshirsagar) करीत आहेत.
Web Title : – Pune Crime | deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis vulgar comment one man booked in pune crime maharashtra political news
हे देखील वाचा :
Chandrasekhar Bawankule | भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे