पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | नाचताना झालेल्या वादातून हॉटेलमधील मॅनेजर (Hotel Manager), बाऊंसर (Bouncer) यांनी मारहाण (Beating) केल्याने त्यांना चुकविण्यासाठी त्याने दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. त्यात एका तृतीयपंथीचा (Transgender) मृत्यु (Death) झाला. वाकड पोलिसांनी (Wakad Police) हॉटेलच्या मॅनेजरविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी एका २४ वर्षाच्या तृतीयपंथीने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६४६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी द बार हिस्ट हॉटेलचे (The Bar Hist Hotel) मॅनेजर गजानन खरात (Gajanan Kharat) याच्यावर गुन्हा दाखल केला. ही घटना २५ जुलै रोजी पहाटे २ वाजता घडली. अभय मनोज गोंडाणे (Abhay Manoj Gondane) (वय २१, रा. येरवडा) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा तृतीयपंथी असून त्याचा मित्र अभय हा विमाननगर येथील एका कंपनीत कस्टमर एक्झीक्युटिव्ह (Customer Executive) म्हणून काम करीत होता. मीस्ट ऑर्गनाशझेशन (Meest Organization) या कंपनीकडून एलजीबीटी लोकांसाठी पार्टी आयोजित केली होती. त्यासाठी फिर्यादी अभय सोबत द बार हिस्ट हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी पार्टीमध्ये मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ते नाचत असताना दुसर्या एका तृतीयपंथीबरोबर किरकोळ भांडणे झाली. यावेळी हॉटेलचे मालक व त्यांची पत्नी तसेच मॅनेजर गजानन खरात यांनी त्यांना हॉटेलमधून बाहेर काढले. त्याचा राग आल्याने अभय हा पुन्हा हॉटेलमध्ये आत गेला. तेव्हा तेथे असलेला बाऊंसर, बार टेंडर, डी जे व मॅनेजर गजानन खरात यांनी दोघांच्या डोक्यात खुर्च्या मारल्या. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. (Pune Crime)
तेव्हा घाबरुन अभय हा पळत बाहेर गेला. त्याच्या मागोमाग गजानन खरात गेला. त्याच्यापासून वाचविण्यासाठी अभय लॉबीत गेला.
तेथून पळून जाण्यासाठी जागा नसल्याने त्याने मरणाच्या भितीने दुसर्या मजल्यावरुन खाली उडी मारली.
अभय खाली रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये (Aditya Birla Hospital) नेले.
तेथे प्राथमिक उपचार करुन ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) आणण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला.
त्याच्या मृत्युस जबाबदार धरुन पोलिसांनी मॅनेजर गजानन खरात विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Death of third party after jumping from second floor of hotel to avoid beating A case has been registered against the manager in the incident at The Bar Hist Hotel in Wakad
हे देखील वाचा :
Mumbai High Court | आम्हाला लहान मुलं समजता का?; हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले