पुणे / मंचर : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पुणे ग्रामीणमधील (Pune Crime) मंचर (Manchar) येथे दिवसाढवळ्या एका तरुणाचा गोळ्या घालून (firing) खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज (रविवार) दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस ठाण्यातील (Manchar Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार उर्फ राण्या बाणखिले (रा. बाणखिले मळा, मंचर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राण्या बाणखिले हा सराईत गुन्हेगार आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.
Uddhav Thackeray | धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा (व्हिडिओ)
हा खून कोणी केला हे अद्याप समजू शकले नाही. आरोपीचा शोध घेतला जात असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहे.
मंचरमध्ये गोळीबाराची घटना झाल्याची माहिती पुणे ग्रामीणमधील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
Web Tital : Pune Crime | Daytime firing at Pune s Manchar The demise of Omkar alias Rana bankhile the excitement in the area
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update