पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | पुण्यातील ओंकारेश्वर घाटावर (Omkareshwar Ghat) दशक्रिया विधीसह इतर विधीसह आवश्यक असे तांबे, पितळ साहित्याची चोरी (Theft) झाल्याची घटना घडली आहे. यापूर्वी देखील या ठिकाणी चोरी झाली होती. हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस चौकीजवळ पुन्हा चोरीची घटना घडल्याने (Pune Crime) खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या घटनेबाबत संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 एप्रिल 2021 रोजी दशक्रिया विधि केल्या जाणाऱ्या ओंकारेश्वर घाटावर गुरुजींचे साहित्य चोरीला गेले होते. आज (शुक्रवार) सकाळी पुन्हा याच ठिकाणी चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी पितळ, तांब्याच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. जवळपास 30 मोठी ताम्हण, 28 लहान ताम्हण, 30 पळ्या, 12 तांबे, 18 छोटे तबक, 28 छोटे शांती तांबे चोरीला गेले आहेत. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ओंकारेश्वर घाटाच्या शेजारी शनिवार पेठ पोलीस चौकी (Shaniwar Peth Police Chowki) आहे. यापूर्वी देखील याठिकाणी चोरीची घटना घडली आहे. पोलिसांनी (Pune Police) या घटनेची दखल घेऊन तपास करावा. याठिकाणी सुरक्षेची व्यवस्था करून तातडीने सीसीटीव्ही बसवावेत जेणेकरून अशा प्रकारांना आळा बसेल, अशी मागणी पोलीस आयक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (Pune Municipal Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे करण्यात आली आहे.
Web Title :- Pune Crime | Dashakriya ritual material was stolen from Omkareshwar Ghat in Pune again
हे देखील वाचा :