पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | सोसायटीत फिरणार्या कुत्र्याच्या (Dog) तोंडावरुन कार घातल्याने त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाल्याची घटना कोरेगाव पार्कमधील (Koregaon Park) एका सोसायटीत घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी डॉक्टर महिलेविरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियमानुसार गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. डॉ. मेघना चावला Dr. Meghna Chawla (रा. डुंगरसी पार्क सोसायटी, बंडगार्डन रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलिसांकडे (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना सोसायटीच्या आवारात मंगळवारी सकाळी 11 वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि डॉ. मेघना चावला (Dr. Meghna Chawla) या एकाच सोसायटीत राहतात. डॉ. चावला यांनी त्यांच्या ताब्यातील कार हयगयीने व निष्काळजीपणे चालवून पुणेकर यांच्या विटकरी रंगाच्या कुत्र्याला धडक दिली. कुत्र्याच्या तोंडावरुन त्यांच्या कारच्या डाव्या बाजूचे पुढील चाक गेल्याने कुत्रा जखमी झाला होता. फिर्यादी यांनी त्यांना उपचाराकरीता प्राण्यांचे डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. कोरेगाव पोलीस तपास करीत आहेत.
Web Title :- pune crime crime registered against dr meghna chawla in koregaon park police station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Crime News | तेलंगणात भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाला जिवंत जाळले