पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | शेतीमाल खरेदी करुन तो परदेशात विक्री करुन पैसा कमविला असतानाही त्याचे पैसे न देता ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी (Bhosari MIDC Police) पोलिसांनी एका ज्येष्ठ नागरिकावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
कमलेश कनन नायर (वय ६३, रा. हर्मेस हेरिटेज, शास्त्रीनगर, येरवडा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संदीप शंकरराव खंडागळे (वय ४७, रा. मोशी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार मोशी प्राधिकरण व कल्याणीनगर येथे १८ सप्टेंबर ते ३० ऑक्टोंबर २०१९ दरम्यान घडला. कमलेश नायर याने फिर्यादी यांचा शेतीमाल खरेदी करुन परदेशात विक्री करुन त्याचे पैसे त्यांना परत देण्याबाबत करार केला व त्यांना त्यांचे पैसे वेळेत परत देण्याचा विश्वास संपादन केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फिर्यादीकडून ८५ लाख ११ हजार ५६९ रुपयांचा माल विकत घेतला.तो माल पुढे परदेशात विकला.दिलेल्या विश्वास व कराराप्रमाणे फिर्यादींना ३० दिवसात विकलेल्या मालाची किंमत देण्याचे कबुल केलेले असताना सुद्धा पैसे दिले नाहीत.
त्यानंतर फिर्यादी यांना त्या मालाच्या किंमतीपोटी चेक देण्याचा बहाणा करुन खात्यात पैसे नसल्याचे माहिती असतानासुद्धा त्याने चेक दिला व त्या चेकने तुमचे पैसे परत करतो, असे खोटे आश्वासन दिले.
चेक बँकेत टाकला असताना तो खात्यामध्ये पैसे नसल्याने वटला गेला नाही.
त्यानंतरही फिर्यादी हे पैसे मागण्यासाठी गेले असताना त्यांना पैसे देण्यास नकार देऊन
शिवीगाळ करुन जीवे मारण्याची व हात पाय तोडण्याची धमकी देऊन फसवणूक केली.
पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime | Crime against Kamlesh Nair in Pune fraud case of Rs 85 lakh.