Pune Crime | पुण्यात ‘बिल्डर’ अविनाश भोसले, विनोद गोयंका आणि विकास ओबेराय यांच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा, प्रचंड खळबळ

Pune Crime | BJP spokesperson beaten in Pune, FIR against 4 NCP workers

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील ‘बिल्डर’ अविनाश भोसले (Builder Avinash Bhosale) यांच्यासह विनोद गोयंका, विकास ओबेराय (Vinod Goenka, Vikas Oberoi) यांच्यासह संगमसिटी टाऊनशीप प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सिद्धार्थ राजेंद्र मयूर यांच्यावर जमिनीच्याब खरेदीखतामध्ये खोट्या नोंदी करून तसेच खोट्या चतु:सीमा नमूद करून दिशाभूल करून खरेदीखताची नोंदणी केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हवेली सब रजिस्टर ऑफिसकडून यासंदर्भात फिर्याद देण्यात आली (Pune Crime) आहे.

अविनाश निवृत्ती भोसले Avinash Nivruti Bhosle (रा. एबीएस पॅलेस, लॉरी इस्टेट, बाणेर रोड), विनोद के गोयंका (कर्मयोग, जुहू, मुंबई), विकास रणवीर ओबेराय (एन. एस. रोड, जुहू, मुंबई), सपना अभय जैन, कल्पना प्रमोद रायसोनी यांच्यासह सुमन निवृत्ती निकम, नितीन निवृत्ती निकम, रूपाली नितीन निकम, निलेश निवृत्ती निकम, देवकी नीलेश निकम, नीलम विकास सूर्यवंशी, अक्षय विकास सूर्यवंशी, विकास विठ्ठलराव पवार, ज्योती राजेंद्र पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी सह दुय्यम निबंधक एल. एम. संगावार (वय 41, रा. टिंगरेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एल. एम. संगावार हे दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक 8 या ठिकाणी 2019 पासून नेमणुकीस आहेत. त्यांच्या कार्यालयाकडे चेतन काळूराम निकम यांनी 2015, 2016 आणि 2019 या वर्षांमध्ये चार तक्रार अर्ज दिले होते. दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक 8 याठिकाणी नोंदविण्यात आलेल्या सात दस्ताबाबत त्यांनी तक्रार केली होती. या तक्रार अर्जाची चौकशी सह जिल्हा निबंधक मुद्रांक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी सुरू केली होती. या चौकशीमध्ये पक्षकारांनी भारतीय नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 चे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या पक्षकारांना विरुद्ध तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. (Pune Crime)

 

Join our Whatsapp Group, Telegram,
and  facebook page for every update
Facebook

पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, संगमवाडी येथील जमिनीच्या खरेदी खताच्या नोंदणी दरम्यान चेतन निकम यांच्या जमिनीच्या खोट्या नोंदी करण्यात आल्या. दस्तामध्ये त्यांची जमीन नमूद न करता ती विक्री करणाऱ्या व्यक्तीची असल्याचे भासविण्यात आले. यासोबतच काही खरेदी खतांमधील सिटीएस क्रमांक चुकीचे टाकून मूळ मालकी असलेल्या अरदेसर बमनजी सेठना दादाभाई अरदेसर सेठणा यांच्या जमिनीच्या देखील चुकीच्या नोंदी केल्या.

तसेच एका खरेदी खतामध्ये खोट्या आराखड्याचा नकाशाचे पान जोडले. यासोबतच चूक दुरुस्ती दस्त नोंदणी करताना तक्रारदार यांची जमीन कल्पना रायसोनी यांची असल्याचे खोटे नमूद करण्यात आल्याचे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे. एका खरेदीखताच्या इंडेक्स 2 मध्ये देखील चुकीचा नोंदी करण्यात आलेले आहेत. जमीन बळकावण्याचा हेतूने तसेच खरेदी खतामध्ये चुकीच्या आणि खोट्या चतुर्सिमा तसेच खोटे सीटीएस क्रमांक नमूद करून पक्षकारांनी नोंदणी अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहेत. त्यानुसार फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Pune Crime | Crime against 15 including builders Avinash Bhosale, Vinod Goenka and Vikas Oberoi in Pune

Rakesh Jhunjhunwala | बिगबुलने ‘या’ कंपनीत कमी केली 10% भागीदारी, केवळ 2 दिवसात विकले 8.5 लाख शेयर

Pune Police Crime Branch | पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकाला IT च्या चौकशीची धमकी, प्रकरण मिटवण्यासाठी 50 लाखाची खंडणी मागणाऱ्याला गुन्हे शाखेकडून अटक

Pune News | दुर्देवी ! वीज कोसळल्यानं वडिलाच्या डोळ्यासमोर मुलीचा मृत्यू