पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगार व्यंकटेश उर्फ विकी शिवशंकर अनपुर (Venkatesh alias Vicky Shivshankar Anpur) याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आजपर्यंत तब्बल 71 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार व्यंकटेश उर्फ विकी शिवशंकर अनपुर (वय-31 रा. सहयोगनगर, वारजे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहे. विकी अनपुर याला एमपीडीए कायद्यान्वये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात (Kolhapur Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)
विकी अनपुर हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिस्टल, कोयता, तलवार, चाकू, लाकडी दांडका यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दुखापत, दंगा, जबरी चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे (FIR) केले आहेत. मागील पाच वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत.
प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी
विकी अनपुर याच्यावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके (Senior Police Inspector Shankar Khatke),
पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | CP Amitabh Gupta takes action of MPDA against 71 criminals till date
हे देखील वाचा :
Atul Bhatkhalkar | ‘सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उद्धव ठाकरेंना सहन होत नाही’, भाजपची टीका
Pune Minor Girl Rape Case | बारा वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन केला बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना
Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार