पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) वार्षिक उत्सवामध्ये झालेल्या शाब्दीक वादाच्या रागातून शाखा प्रशिक्षकाला (Branch Instructor) लाकडी दंड, चामडी पट्ट्याने बेदम मारहाण (Beating) करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुण्यातील (Pune Crime) सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी हर्षवर्धन सुनील हरपुडे Harshvardhan Sunil Harpude (वय – 21, रा. तावरे कॉलनी, सहकारनगर) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कुंदन सोनावणे (Kundan Sonawane), रुपेश खाडे (Rupesh Khade), अमन शेख (Aman Sheikh), हेमंत जाधव (Hemant Jadhav) यांच्यासह चार ते पाच अल्पवयीन (Minor) मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सहकारनगरमधील अध्यापक कॉलनीतील मैदानावर मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडला. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षवर्धन हरपुडे हे एलएलबीचे (LLB) प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहेत.
ते अनेक वर्षांपासून अध्यापक कॉलनीतील मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेत लहान मुलांना प्रशिक्षण देण्याकरीता जातात.
टांगेवाला कॉलनी येथे राहणारे हेमंत जाधव, कुंदन सोनावणे, अमन शेख व इतर हेही शाखेमध्ये येत होते. 4 ते 5 वर्षांपूर्वी शाखेच्या वार्षिक उत्सवामध्ये त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्यामुळे त्यांनी शाखेत येण्याचे बंद केले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मंगळवारी नेहमीप्रमाणे ते शाखेत गेले होते.
शाखा संपल्यावर ते बाजूच्या कट्यावर बसले असताना काही लहान मुले अमित हिरणवाळे (Amit Hiranwale) याला हाताने मारहाण करु लागले.
तेव्हा फिर्यादी यांनी त्या मुलांना थांबवून भांडणे न करण्याचे समजावून सांगू लागले.
ही भांडणे पाहून हेमंत जाधव, कुंदन सोनावणे इतर तेथे आले. कुंदन याने कमरेच्या चामडी पट्ट्याने, रुपेश खाडे याने ग्राऊंडवर पडलेल्या झाड्याच्या फांदीने फिर्यादी यांना बेदम मारहाण केली.
कट्ट्यावर ठेवलेला लाकडी दंड फिर्यादीच्या पाठीत जोरात मारला.
सहायक पोलीस निरीक्षक बेरड (API Berad) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Coach fined and beaten with leather belt over dispute in the annual festival of rss branch pune sahakarnagar
हे देखील वाचा :
MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट
Bhandara Crime | 12 वी पास झाल्यानंतर सेलिब्रेशनसाठी गेलेल्या युवकाचा धक्कादायक शेवट
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या प्रमुख शहरातील रेट