Pune Crime | पोस्कोच्या खटल्यातील वॉरंट बजावून अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी केली झटापट, गाडीसह खाली पाडून गेला पळून

Pune Crime | a lemon sorbet seller was robbed at gunpoint during the day Pune Crime news

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Pune Minor Girl Rape Case) केल्याच्या गुन्ह्यातील खटल्यात हजर रहात नसल्याने न्यायालयाने दिलेले अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस आरोपीला पकडून घेऊन जात होते. त्यावेळी त्यांना गाडीसह खाली पाडून आरोपी पळून गेला. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

गणेश बाळु भरेकर Ganesh Balu Bharekar (वय २३, रा. जयभवानीनगर, पौड रोड) आरोपीचे नाव असून त्याच्या आईविरुद्ध आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरुन गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याप्रकरणी पोलीस हवालदार शिवाजी मारुती पारगे (Shivaji Maruti Parge) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १८४/२२) दिली आहे.
हा प्रकार जयभवानीनगरमधील गल्लीच्या मुख्य रस्त्यावर गुरुवारी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश भरेकर याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकणी २०२० मध्ये पोस्को (POSCO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या खटल्यात जिल्हा न्यायाधीश जे एस राजे (District Judge JS Raje)
यांनी गणेश भरेकर याच्या विरुद्ध अजामिनपात्र वॉरंट काढले होते.
हे वॉरंट बजावण्यासाठी पोलीस हवालदार शिवाजी पारगे व पोलीस नाईक बांदल (Police Naik Bandal) गेले होते.
त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन दुचाकीवरुन घेऊन जात होते. तेव्हा गणेश भरेकर याने हवालदार पारगे यांच्याशी झटापटी करुन त्यांना गाडीसह खाली पाडले.
तो पळून जाऊ लागला. तेव्हा पारगे यांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले.
तेव्हा त्याची आई पळत आली.
तिने पारगे यांच्याशी झटापटी करत मोठमोठ्या शिवीगाळ करुन तुम्हाला मी पाहून घेते अशी दमबाजी करुन तुमच्याविरुद्ध कमिशनरकडे तक्रार करते, असे म्हणून त्यांना धक्काबुक्की केली.
आरोपीला फिर्यादीच्या ताब्यातून पळून जाण्यास मदत केली.
पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणून अटक करण्यापासून अटकाव केल्याने गुन्हा दाखल केला आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title : – Pune Crime | Clashes with policemen who went to arrest warrants in POSCO case runs away with car

 

हे देखील वाचा :

Pune News | नदी पात्रातील रस्त्यावरुन वाहत जाणार्‍या मोटारीतील ५ जणांना वाचविले; अग्निशामक दलाच्या जवानांची कामगिरी

Pune Crime | पतीला दुसरे लग्न करायचे असल्याने होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; केशवनगर-मुंढव्यातील घटना

Rain in Maharashtra | राज्यात पुढचे 4 दिवस धुवाँधार, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट