पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून दुचाकीवरुन पळून जाणार्या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या (Pune Crime) हवाली केले.
राहुल राजेंद्र पवार (वय 20, रा. आव्हाळवाडी रोड, वाघोली) असे या चोरट्याचे नाव आहे. ही घटना वडगाव शेरी येथील आनंदपार्क (anand park wadgaon sheri) येथील रोडवर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी वडगाव शेरी येथे राहणार्या एका 52 वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात Chandan Nagar Police Station (गु. र. नं. ३००/२१) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांची सून आणि नात हे बाजारासाठी जात होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील छोटी पर्स हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपीचा तोल गेल्यामुळे तो दुचाकीवरुन खाली पडला. यावेळी नागरिकांनी चोरट्याला पकडून ठेवले.
याची माहिती चंदननगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चोरट्याला (Pune Crime) ताब्यात घेतले. सहायक पोलीस निीरक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Citizens caught the thief who snatched the purse from the woman’s hand and fled.
Ajit Pawar | अजित पवारांशी संबंधीत साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे, उपमुख्यमंत्री म्हणाले…