Pune Crime | Google वर कस्टमर केअर नंबर शोधणे आले अंगलट; पावणेदोन लाखांना गंडा

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | गुगलवरुन कस्टमर केअर नंबर शोधणे एका नागरिकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. सायबर चोरट्याने त्यांना अॅप डाऊनलोड करायला सांगून त्यात माहिती भरायला लावून तब्बल पावणे दोन लाख रुपयांना गंडा घातला. (Pune Crime)
याप्रकरणी कात्रज (Katraj) येथील ५१ वर्षाच्या नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना १९ व २० जुलै २०२१ दरम्यान घडली. फिर्यादी यांनी गुगल पेवरुन (Google Pay) रिचार्ज केले असताना ते झाले नाही. त्यामुळे त्यांनी गुगलवरुन कस्टमर केअर नंबर शोधला.
हे नंबर सायबर चोरट्यांनी टाकले होते. त्यावरील दोन क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला असताना ते त्यांनी फिर्यादीला एनीडेक्स अॅप डाऊनलोड करावयास सांगितले व त्यात त्यांना माहिती भरायला सांगितली. त्यानुसार फिर्यादी व फिर्यादीचे वडिलांच्या अॅक्सिस (Axis Bank Account) व एस बी आय बँक (SBI Bank Account) खात्याची माहिती घेऊन त्या खात्यातून थोडी थोडी करुन १ लाख ७४ हजार ९६० रुपये काढून घेऊन फसवणूक (Cheating Case) केली.
Web Title :- Pune Crime | Cheating Fraud Case Katraj Area Bharti Vidyapeeth Police Station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Kirit Somaiya in Pune | पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्यांना धक्काबुक्की; प्रचंड खळबळ (व्हिडीओ)
Comments are closed.