पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | भावाला जीवे मारण्याची धमकी देत तरुणाने आपल्या मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) एकाला अटक केली आहे. हा प्रकार ९ जुलै २०१९ पासून आतापर्यंत सुरु होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे दोघेही धायरी परिसरात रहायला आहेत. आरोपीचे तक्रारदार तरुणीच्या चुलत बहिणीबरोबर लग्न झाले आहे. आरोपीने जबरदस्तीने फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. त्यांनी विरोध केल्यावर त्यांना झाडुने मारहाण केली. हा प्रकार कोणाला सांगितल्यास भावाला जीवे मारण्याची धमकी राहुल याने फिर्यादीला दिली होती. या धमकीमुळे फिर्यादी हा अत्याचार सहन करत होती. शेवटी या अत्याचाराला कंटाळून तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन राहुलला अटक केली आहे.
Web Titel : Pune Crime | cheating case news
Pune Crime | भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन मेव्हणीवर केला बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 254 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी