पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यातील (Pune Crime) लोहगाव (Lohgaon) येथे रो हाऊससाठी गुंतवलेले पैसे अनेक वर्षे परत न मिळाल्याने येरवडा येथील एका कॅटरिंग व्यवसाय (Catering business) करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली. गणेश लाड (वय-32) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police) अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रो हाऊसमध्ये (row house) गुंतवलेले पैसे (invest money) परत मिळाले नसल्याने गणेशने आत्महत्या (Pune Crime) केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गणेश लाड (Ganesh Lad) हा येरवडा परिसरातील एक तरुण कॅटरिंग व्यावसायिक होता.
त्यासोबत शिव वाहतूक सेना (Shiv Vahatuk Sena) व बी.के. ग्रुपचा (B.K. Group) सदस्य होता. बुधवारी रात्री त्याने अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली.
गणेशने लोहगाव येथे रो हाऊससाठी एका डेव्हलपर्सकडे (Developers) पैसे गुंतवले होते.
मात्र, डेव्हलपर्सकडून रो हाऊस किंवा पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे तो तणावात होता.
या तणावातून त्याने बुधवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.
गणेशच्या आत्महत्येनंतर लोहगाव येथील डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल करावा यासाठी त्याची पत्नी व नातेवाईक येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) आले होते.
त्यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गणेश लाडवर येरवडा येतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गणेशच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आहे.
पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.
Web Title : Pune Crime | Catering businessman commits suicide in Pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
EPF |EPF अकाऊंटमध्ये झाली चूक, तर दुरूस्त करू शकता; जाणून घ्या सोपी पद्धत
Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात पिस्तुल नाचवत मयत गुंड ‘भावेश’च्या बिर्थडेचं ‘सेलिब्रेशन’