Pune Crime | पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या आवारातच मोक्का गुन्ह्यातील आरोपीला दिला गांजा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना प्रकार घडल्याने खळबळ
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | मोक्का गुन्ह्यात (MCOCA) Mokka अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाच्या परिसरात गांजा (Marijuana) दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांचा (Pune Police) बंदोबस्त असताना आरोपीला गांजा दिल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.9) शिवाजीनगर न्यायालयाच्या (Shivajinagar Court Pune) आवारात घडला आहे. याप्रकरणी गांजा पुरविणाऱ्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.
मेहबूब जब्बार पठाण Mehboob Jabbar Pathan (वय – 25 रा. स्वारगेट) याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पठाण याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला गुरुवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता. पोलिसांचा बंदोबस्त असताना कोर्टातील गर्दीचा फायदा घेत पठाण याच्या साथीदाराने त्याला गांजाची पूडी दिली. पोलिसांनी पठाण याची अंगझडती घेतली त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पठाण याला देण्यात आलेल्या पुडीमध्ये एक ग्रॅम गांजा असल्याचे स्पष्ट झाले. (Pune Crime)
पोलीस बंदोबस्तात असताना आरोपीला गांजा दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पठाण याच्यासह गांजा देणाऱ्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior Police Inspector Arvind Mane) यांनी दिली. पोलिसांकडून न्यायालय परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात असून गांजा पुरवणाऱ्या आरोपीचा लवकरच शोध घेतला जाईल असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Cannabis given to accused in Mocca crime in Shivajinagar court premises in Pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Devendra Fadnavis | ‘राज्यसभेतील भाजपचा विजय हा लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित’ – देवेंद्र फडणवीस
- Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीला पळवून नेवून लैंगिक अत्याचार, 20 वर्षीय तरूणाचं कृत्य
- Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार शुभम ऊफाळे एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 68 जणांवर कारवाई
- Pune Crime | कोथरुड परिसरात दुकान चालविण्यासाठी दररोज 1 हजारांची खंडणी; कोयत्याचा धाक दाखवून गुंडांनी गल्ल्यातील रोकड नेऊन दुकानाचा बोर्ड जाळला
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्त्यामध्ये (DA) 5 टक्के वाढ निश्चित; जाणून घ्या
Comments are closed.