Pune Crime | शरीर संबंधासाठी मुलगी देण्याच्या बहाण्याने 53 वर्षाच्या व्यक्तीचे अपहरण करून उकळले पैसे; पुण्यातील प्रकार

Pune Crime News | 3 children rescued from Jungli Maharaj street; A case of kidnapping has been registered

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | शरीर संबंधासाठी मुलगी देतो असे सांगून एका 53 वर्षांच्या व्यक्तीला बोलावून घेतले. त्यानंतर त्याला मारहाण करून त्याचे अपहरण करत पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच मुलीसबोत लॉजवर जात असल्याचे पत्नीला सांगून बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणी स्वरूपात पैसे घेतले. हा प्रकार (Pune Crime) पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडला असून, याप्रकरणी 17 ते 19 वयोगटातील चार जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत 53 वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धीरज वीर (वय 19) आणि जॉय मंडल (वय 19) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 3 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत घडला आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी हे एका नामांकित कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करतात.
आरोपी आणि त्यांची ओळख एका लॉजवर झाली होती. आरोपींनी शरीर संबंधासाठी मुलगी देतो असे सांगून फिर्यादी यांना बंडगार्डन परिसरात बोलावून घेतले.
फिर्यादी हे त्यांच्या गाडीतून आले असता आरोपींनी त्यांना मारहाण करून अपरहण केले. फिर्यादी यांचे एटीएम कार्ड
काढून घेऊन येरवडा परिसरातील एका एटीएममधून 25 हजार रुपये काढून घेतले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना मुलीसोबत लॉजवर जातो हे पत्नीला सांगून बदनामी करण्याची धमकी दिली.
तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार केली, तर कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी 93 हजार रुपये
खंडणी स्वरूपात घेतले. आरोपींनी पुन्हा पैशांची मागणी केली असता फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत
आरोपींविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | called the sales manager and kidnapped and extorted money as he was giving a girl for enjoyment

 

हे देखील वाचा :

Pune Crime | शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची कोट्यवधींची फसवणूक; पुणे जिल्ह्यातील प्रकार

Military Recruitment for Woman | पुण्यात महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळावा सुरू

Pune Crime | गुंगीचे औषध देऊन घरगड्यानेच केली तब्बल 24 लाखांची चोरी