बहुजननामा ऑनलाइन टीम – तडीपारीच्या कालावधीमध्येही शहरात वावर करणार्या सराईतला गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून अटक केली आहे. मनोज विकास हावळे (वय 20 वर्ष रा. 13 ताडीवाला रोड पुणे) असे अटक करण्यात ( Crime Branch Unit-1)आलेल्या सराईताचे नाव आहे.
हावळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचे दोन तर दरोड्याचा एक गुन्हा दाखल आहे.
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट एकचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील पोलिस नाईक आय्याज दड्डीकर यांना तडीपार असलेला सराईत गुन्हेगार मनोज हावळे ताडीवाला रोडवरील वन्नाप्पा चौकात उभा असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तडीपारीच्या कालावधीत तो शहरात आल्याचे निष्पन्न झाले. ही कामगिरी पोलिस उप निरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलीस कर्मचारी अय्याज दड्डीकर, इम्रान शेख, महेश बामगुडे, महेंद्र करगळ यांच्या पथकाने केली.