पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पोलीस चौकीत तक्रार देण्यास आलेल्या Covid सेंटरच्या डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याचे पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे. सचिन सिद्धेश्वर गायकवाड (Gaikwad) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सचिन व त्यांच्या भावावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सचिन गायकवाड (Gaikwad) हे गुन्हे शाखेच्या युनिट तीनमध्ये कर्तव्यास आहेत.
बाणेर येथे महापालिकेचे डेडिकेटेड Covid सेंटर आहे. सोमवारी डॉ. अजयश्री सेंटरच्या कार्यालयात बसले होते. यावेळी एकजण त्याच्या कार्यालयात आला.
त्याने प्रवीण नावाचा रुग्ण भाचा असल्याचे सांगितले. तुम्ही आमचे फोन का उचलत नाही असे म्हणत डॉक्टर आणि तेथील कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली.
तसेच मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जात सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणानंतर डॉ. अजयश्री हे इतर स्टाफ आणि महापालिकेच्या सिक्युरिटी गार्ड सोबत बाणेर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले होते. येथील पोलीस कर्मचाऱ्यांना झालेल्या प्रकाराची माहिती देत असताना येथे सागर गायकवाड आणि सचिन गायकवाड यांनी आत प्रवेश केला.
तसेच, पुन्हा त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणारे सिक्युरिटी ऑफिसर अजित गजमल यांनाही मारहाण केली होती.
याप्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर सचिन गायकवाड यांचे पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
…म्हणून 500, 200 आणि 2 हजारांच्या नोटांवरील रंग होतोय फिकट
Corona आणि ब्लॅक फंगसनंतर मुलांमध्ये MIS-C चा धोका, याबाबत जाणून घ्या सर्वकाही
लाच प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीनंतर पोलिस उपनिरीक्षक निलंबीत
महिलेच्या मृत्यूनंतर रेल्वे पोलिसाचे अजब उत्तर, म्हणाले – ‘आधीच मनुष्यबळ कमी, सगळीकडं कस लक्ष देणार’
दिलासादायक ! भारतातील कोरोना संक्रमणाचा वेग घसरतोय, जाणून घ्या गेल्या 24 तासातील आकडेवारी