Pune Crime Branch News | पुणे: पिस्तुल बाळगणाऱ्या 2 आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक, पिस्तुल व काडतुस जप्त

Pistol
July 10, 2024

पुणे : – Pune Crime Branch News | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना अटक करुन त्यांच्याकडून पिस्टल आणि जिवंत काडतुस जप्त केले आहे. त्यांच्याकडून एक लाख 3 हजार रुपये किंमतीचे चार पिस्टल आणि सात काडतुसे जप्त केली आहेत. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-2 च्या (Anti Extortion Cell Pune) पोलिसांनी ही कारवाई वडगाव खुर्द (Vadgaon Khurd) परिसरातील कॅनॉल रोडवर केली. (
Pistol – Cartridges Seized)

संकेत शिवाजी गांडले Sanket Shivaji Gandle (वय-21 रा. नांदेड फाटा, पुणे), मंगेश राजु भोसले Mangesh Raju Bhosale (वय-21 रा. कोल्हेवाडी, सिंहगड रोड फाटा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Shinhagad Raod Police Station) आर्म अॅक्ट नुसार (Arms Act) गुन्हा दाखल केला आहे.

खंडणी विरोधी पथक-2 चे पोलीस अधिकारी, अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व पवन भोसले यांना माहिती मिळाली की, वडगाव खुर्द परिसरातील प्रायेजा सिटी कडे जाणाऱ्या कॅनॉल रोडवर दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन चार पिस्टल आणि सात काडतुसे असा एकूण 1 लाख 3 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे, आजिनाथ येडे, पवन भोसले, संग्राम शिनगारे, विजय गुरव, सैदोबा भोजराव, गणेश खरात, चेतन आपटे, राहुल उत्तरकर, चेतन शिरोळकर, चेतन चव्हाण यांच्या पथकाने केली.