Pune Crime Branch News | खूनासह 4 गुन्हे असलेल्या गुंडाकडून पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

August 29, 2024

पुणे : Pune Crime Branch News | खूनासह ४ गुन्हे असलेल्या गुंडाकडून खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell Pune) एक पिस्टल आणि एक जिवंत राऊंड जप्त केले आहे (Pistol Seized ). ऋतिक कैलास एखंडे Hrithik Kailas Ekhande (वय २३, रा. एरंडवणा,पुणे)असे या गुंडाचे नाव आहे.

खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे (Rajendra Landge Police), मयूर भोकरे (Mayur Bhokare Police) यांना पाहिजे असलेला आरोपी ऋतिक एखंडे हा कर्वेनगरमधील (Karve Nagar Pune) सहवास कॉर्नर येथे येणार असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशीमध्ये एक पिस्टल व एक जिवंत राऊंड घरात ठेवला असल्याचे सांगितले. २५ हजार १०० रुपयांचा माल घरातून जप्त करण्यात आला.

ऋतिक एखंडे याच्यावर २०१७ मध्ये कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) खूनाचा गुन्हा दाखल आहे (Murder Case). उत्तमनगरमध्ये २०२१मध्ये खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल आहे (Uttam Nagar Police Station). डेक्कन (Deccan Police Station) आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) आर्म अ‍ॅक्टचा (Arms Act) गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील (API Abhijit Patil) करत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (Shailesh Balkawade IPS), पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (Nikhil Pingle DCP), सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे (Gangesh Ingle ACP), खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Shailesh Sankhe PI) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (Vijaykumar Shinde API), अभिजित पाटील, सहायक पोलीस फौजदार प्रवीण धमाळ, पोलीस हवालदार सयाजी चव्हाण, रवींद्र फुलपगारे, अमोल आवाड, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, प्रफुल्ल चव्हाण, राजेंद्र लांडगे, मयूर भोकरे, अमर पवार, गीतांजली जांभुळकर, अंकुश भिसे यांनी केली आहे.