Pune Crime Branch News | पान मसाला, गुटखा विक्री करणार्‍या दोघांकडून 10 लाख 84 हजारांचा माल जप्त

October 1, 2024

पुणे : Pune Crime Branch News | शासनाने गुटख्यावर बंदी (Ban On Gutkha) आणली असली तरी तो सर्वत्र राजरोजपणे विकला जातो आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Norcotics Cell Pune)रास्ता पेठेतून (Rasta Peth Pune) दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १० लाख ८४ हजार ७१६ रुपयांचा पान मसाला, तंबाखु जप्त केला आहे. मुदसर इलियास बागवान (वय ४०, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) आणि अन्वर शरफुद्दिन शेख (वय ३८, रा. कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना बातमी मिळाली की, रास्ता पेठेतील श्रीराम अपार्टमेंट येथे मोठ्या प्रमाणावर पान मसाला, गुटखा यांचा साठा केला आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा मारुन कारवाई केली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, ,सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार आझाद पाटील, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदिप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर, सय्यद साहिल शेख, संदिप शेळके, युवराज कांबळे, अझिम शेख, नितीन जगदाळे, प्रशांत बोमादंडी, मयुर सूर्यवंशी, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.