Pune Crime Branch News | दोघा सराईत गुन्हेगारांकडून 2 गावठी पिस्तुल हस्तगत ! 10 लाखांचे घरफोडीचे दागिने जप्त

February 4, 2025

पुणे : Pune Crime Branch News | गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाने दोघा सराईत गुन्हेगारांकडून २ गावठी पिस्तुले व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. त्याचबरोबर वाहन चोरी व घरफोडीतील दागिने हस्तगत केले आहेत.

समीर ऊर्फ कमांडो हनीफ शेख (वय १९, रा. सय्यदनगर, हडपसर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार नितीन मुंढे यांना मिळालेल्या खबरीवरुन फुरसुंगी येथील गंगानगर येथे सापळा रचून समीर शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे, घरफोडीचे साहित्य आणि चोरीचे मोटारसायकल जप्त केली आहे. (Arrest In Theft Case)

त्याच्याकडे तपास केला असताना त्याने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी केल्याचे तसेच लोणी काळभोर व हडपसर परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. त्याला गावठी पिस्तुल पुरविणार्‍या यश मुकेश शेलार (वय २०, रा. तरडे वस्ती, महंमदवाडी) याला अटक करुन त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल जप्त केले आहे.
समीर शेख याच्याकडून १० लाख ६५ हजार ६०० रुपयांचे विविध वर्णनाचे एकूण १४४ ग्रॅम सोन्याचे दागिने, हिरो कंपनीची स्पलेंडर मोटारसायकल व अ‍ॅक्टीव्हा असा एकूण १२ लाख १७ हजार ४०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीखक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, पोलीस हवालदार सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केले आहे.